27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राऊत आणि अनिल परब यांना अटक होणार

संजय राऊत आणि अनिल परब यांना अटक होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वैर गेल्या काही महिन्यांत शिगेला पोहोचले आहे. आज नवनीत राणा यांनी एक मोठे खळबळजनक विधान केले आहे. संजय पांडे यांच्यानंतर आता पुढचा नंबर शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते अनिल परब यांचा आहे. या दोघांना अटक होणार, असे विधान नवनीत राणा यांनी केले आहे.

याबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, जेव्हा ईडी कुणावर कारवाई करते, तेव्हा ती पूर्ण पुरावे आणि साक्षीनिशी करते. पुराव्याशिवाय ईडीकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यानंतर महाराष्ट्रात खूप नेत्यांचे नंबर येणार आहेत. मागच्या सहा-सात महिन्यांत अनिल परब यांची अनेकदा ईडीकडून चौकशी झाली आहे. अनिल परब यांनी दिलेली उत्तरेही ईडीसाठी समाधानकारक नाहीत.

त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा चौकशीला बोलावले जात आहे. तसेच संजय राऊत यांचीही अनेकदा ईडीकडून चौकशी झाली आहे. त्यांना ईडीच्या अनेक नोटिसा येत आहेत. आता संजय पांडे जेलमध्ये गेले आहेत. त्यानंतर यांचा आता नक्कीच नंबर लागणार आहे, असा इशाराच राणा यांनी देऊन टाकला आहे.

किशोरी पेडणेकरांचे राणा यांना सणसणीत उत्तर
नवनीत राणा या छान भविष्यवाणी करतात, असा टोला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणा यांना लगावला आहे. न्यायिक बाजू आणि जे काही आहे यावर मी बोलणार नाही, मात्र शिवसेनेचे जे दोन्ही वाघ आहेत, ते या सगळ्याला निभावून पुढे जातील. मात्र आतापर्यंत दिल्ली गल्लीत बघत नव्हती मात्र आता दिल्ली गल्लीही बघायला लागली, असा सणसणीत टोलाही त्यांना लगावला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या