18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राऊत लढवय्ये नेते - आदित्य ठाकरे

संजय राऊत लढवय्ये नेते – आदित्य ठाकरे

एकमत ऑनलाईन

मुंबई: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आदित्य ठाकरेंनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. संजय राऊत लढवय्ये नेते असून त्यांच्या सुटकेने
आज प्रत्येक शिवसैनिकाला आनंद झाला आहे.

हा निर्णय लोकशाहीसाठी चांगला असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली. ‘सरकारविरोधात बोलल्यानंतर आता चौकशीचा ससेमिरा लावला जातो. तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिला जातात.

सत्य बोलणा-यांना, प्रश्नांना वाचा फोडणा-या नेत्यांना त्रास दिला जात आहे. मात्र संजय राऊत डरपोक नाहीत. ते पळून गेले नाहीत. तपास यंत्रणांना, कारवाईला सामोरे गेले. कारण संजय राऊत लढवय्ये नेते आहेत,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.

राऊत यांच्या जामिनाला सक्तवसुली संचलनालयाने विरोध केला. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. अखेर आज कोर्टाने त्यांना आज जामीन मंजूर केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या