23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राऊत अखेर ईडीच्या ताब्यात

संजय राऊत अखेर ईडीच्या ताब्यात

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अखेर ९ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार असून तिथे अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला होता. संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली आहे. मुंबई पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे.

खासदार संजय राऊत यांची गेल्या १० तासांपासून ईडीकडून चौकशी सुरु आहे. पत्राचाळा घोटाळाप्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. ईडीच्या सात अधिका-यांकडून राऊतांच्या घरी झाडाझडती सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. राऊतांच्या खोलीमधील कागदपत्रं आणि दस्ताऐवज ईडीकडून तपासले जात आहेत. याशिवाय राऊत यांच्या दादर इथल्या गार्डन कोर्ट इमारतीमधील फ्लॅटवरही ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. या दरम्यान, ईडीच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली.

संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिक जमा झाले असून घोषणाबाजी सुरू आहे. शिवसैनिकांना अटकाव करण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. राऊत यांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि मागील दरवाजाजवळ पोलीस बंदोबस्त तैनात आहे. राऊतांना मागील दरवाज्यातून नेण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील ९ तासांपासून खासदार संजय राऊतांच्या दादरमधील फ्लॅटमध्ये ईडीचे सर्च ऑपरेशन सुरुच आहे. दादरमधील गार्डन कोर्ट इमारत परिसरात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आली आहे. या इमारतीखाली सीआरपीएफ जवान आहेत. ईडीने आज संजय राऊत यांच्याशी संबंधित ठिकाणी छापा मारला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या