22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राऊत यांचा जामीनासाठी अर्ज

संजय राऊत यांचा जामीनासाठी अर्ज

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात त्यांनी हा अर्ज दाखल केला असून यावर उद्या म्हणजे गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ईडीने खासदार संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे.

खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने १९ सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी ईडीने अटक केली होती. या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषधे पुरवण्याची मुभा न्यायालयाने दिले होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या