24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय सावकारेंचे खडसेंना बळ?

संजय सावकारेंचे खडसेंना बळ?

एकमत ऑनलाईन

जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांना विजयासाठी तीन ते चार मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. तर भाजप आमदार संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे निकटवर्ती असल्याने सावकारे यांचे मत खडसेंना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, एकनाथ खडसे हे माझ्यासाठी आदर्श असून आजही मी त्यांना मानतो. मात्र, मला पक्ष सांगेल त्यांना मी मतदान करेन, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी मतदानाबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

दरम्यान, संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे निकटवर्ती असल्याने सावकारे यांचे मतदान खडासेंनाच अशी चर्चा आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसे हे भाजपात असताना संजय सावकारे यांना आमदार करण्यात एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा आहे. तेव्हापासून सावकारे यांना खडसेंचे निकटवर्तीय म्हणून संबोधले जाते. खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्याच्या पाठोपाठ आमदार संजय सावकारे हे सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील, अशी चर्चा रंगली होती. आता पुन्हा खडसे यांच्यासोबत संजय सावकारे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली आहे. अवघ्या तीन दिवसांवर विधानपरिषदेची निवडणूक येवून ठेपली असून त्यातील रंगत वाढत आहेत. एक-एक मतासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकनाथ खडसेंनाही तीन ते चार मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यातच भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे हे खडसेंचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे सावकारे हे खडसेंनाच मतदान करतील, अशी चर्चा जोर धरु लागली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या