21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिकचे सप्तशृंगी देवी मंदिर पुढील दीड महिना बंद राहणार

नाशिकचे सप्तशृंगी देवी मंदिर पुढील दीड महिना बंद राहणार

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर चारच्या सुमारास ढगफुटीसदृश पावसामुळे भाविक भयभीत झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची तारांबळ होऊन सहा ते सात भाविक जखमी झाले होते.

या मंदिर मार्गावर मोठ्या प्रमाणात गाळ, दगड, कचरा इतर साहित्य येऊन पडल्याने मार्ग देखील खचल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता सप्तशृंगी देवी ट्रस्टने मंदिर पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर भाविकांचा मोठा राबता असतो. अशातच गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक गावांतील संपर्क तुटला आहे. तर काल सायंकाळी सप्तशृंगी मंदिर मार्गावर अचानक झालेल्या ढगफुटीमुळे भाविक भयभीत झाले.

या मार्गाची दयनीय अवस्था झाली असून मंदिर गाभा-यात देखील स्वच्छतेची आवश्यकता असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या ठिकाणी संपूर्ण परिसरातील बांधकामाची देखभाल-दुरुस्ती करावी, नव्याने बांधकाम करण्यासाठी देवस्थान ट्रस्टला वेळ आवश्यक असल्याने ‘मंदिर बंद’चा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील ४५ दिवस म्हणजे दीड महिना सप्तशृंगी देवीचे दर्शन घेता येणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या