मुंबई, दि.१३ (प्रतिनिधी) निवडणूक बिनविरोध करण्याच्या नावाखाली सरपंच व सदस्यपदाचा लिलाव करण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्यातील उमराणे, व नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज ही घोषणा केली.
सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच आयोगाकडे तक्रारीदेखील आल्या होत्या. यामुळे आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले होते. जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिचित्रफितींचे अवलोकन केल्यानंतर उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया रद्द केली आहे. या प्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले असून, भारतीय दंड विधानाचे कलम १७१ (क) अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिक आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
शेती व्यवसाय फायद्याचा ठरण्यासाठी शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करावा