26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रघोडेबाजार टाळण्यासाठी सरपंच, नगराध्यक्ष निवड जनतेतून

घोडेबाजार टाळण्यासाठी सरपंच, नगराध्यक्ष निवड जनतेतून

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्या सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी थेट जनतेतून सरपंच निवडीचे आणि नगराध्यक्ष निवडीचे विधेयक मांडले आहे. सरकारने हा जो निर्णय घेतला आहे तो असाच घेतला नसून जनतेचे मत जाणून घेऊनच घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितले आहे. त्याचबरोबर या निर्णयावरील विरोधकांच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.

असे निर्णय आपण जनतेच्या मतानुसार घेत असतो, जनता जे बोलणार तेच आम्ही करणार असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे. तर थेट सरपंच निवडीवरून विरोधक टीका करत असून मतांचा घोडेबाजार होईल असे म्हणत आहेत, पण मतांचा घोडेबाजार फक्त एका वॉर्डात होऊ शकतो संपूर्ण शहरात होणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी, मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून करा अशी मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की घटनेच्या तरतुदीनुसार आपण नगराध्यक्षाची निवड करत असतो आणि त्यासंदर्भातील अधिकार राज्याला दिले आहेत. त्यामुळे आपण यामध्ये बदल करू शकत नाही असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

अजित पवारांचाही दिला दाखला
जे काही झाले ते का झाले? हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यावर मी जास्त बोलणार नाही. जेव्हा एखादा निर्णय घेतला जातो तेव्हा अनुभवामुळेच बदलला जातो. अजित पवारही म्हणाले होते की, जनतेतून नगराध्यक्षांची निवड करण्यात यावी असे मुख्यमंत्री विधानसभेत बोलताना म्हणाले आहेत.

विरोधकांचाही मान ठेवणार
राज्यातील ९ हजार ग्रामपंचायतींनी थेट जनतेतून सरपंच निवडीची मागणी केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे ऐकतो, त्यावरून हा निर्णय घेतला आहे असून आमचे सरकार सक्षम आहे. आम्ही बहुमताच्या जोरावर काम करणार असून विरोधकांचा मान ठेवून काम करणार आहोत असे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या