33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home महाराष्ट्र सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडती लवकरच काढणार ! -हसन मुश्रीफ

सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडती लवकरच काढणार ! -हसन मुश्रीफ

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१९ (प्रतिनिधी) निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या १४ हजार २३४ ग्रामपंचतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत लवकरच म्हणजे येत्या आठ ते दहा दिवसात काढण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिली. ग्रामसभांना मात्र ३१ मार्चपर्यंत स्‍थगिती देण्याचा विचार राज्‍य सरकार करत असल्‍याची माहितीही त्‍यांनी दिली.

सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सोडत काढून ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच आणि उपसरपंचांकडे देण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. राज्यातील १४ हजाराहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सरपंचपद मिळविण्यासाठी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी ग्रामविकास विभागाने निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला होता.

ग्रामपंचायत निवडणुकीआधी सरपंचपदासाठी सोडत काढल्यानंतर पद मिळवताना सरपंचपदासाठी बोगस जात प्रमाणपत्र सादर करणे असे गैरप्रकार होत असल्याचे ग्रामविकास विभागाच्या लक्षात आले. ज्या प्रवर्गासाठी सरपंचपद आरक्षित असल्याचे त्या प्रवर्गाच्या प्रभागात चुरशीने निवडणूक व्हायची. हे टाळण्यासाठी निवडणुकीनंतर आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय झाला.त्‍यामुळे यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुकांत मतदानाच्या टक्‍केवारीतही चार टक्‍क्‍यांनी वाढ झाली.२०१४-१५ मध्ये ७६ टक्‍के असणारे मतदान यावेळी ८० टक्‍कयांवर गेल्‍याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत स्थगिती
दरम्यान, ग्रामसभा आयोजित करण्याच्या निर्णयाला ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली जाण्याची शक्यता असल्याचे हसन मुश्रीफ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ग्रामविकास विभागाने ग्रामसभांना परवानगी दिली आहे. मात्र, सध्या अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक आहेत. एका प्रशासकाकडे चार ते पाच ग्रामपंचायतींचा कारभार आहे. एका प्रशासकाला एकाचवेळी इतक्‍या ठिकाणी ग्रामसभेला हजर राहणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामसभा आयोजित करण्याच्या निर्णयाला ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली जाऊ शकते. याचा निर्णय बुधवारी होणा-या मंत्रिमंडळ बैठकीत होऊ शकते असेही मुश्रीफ म्हणाले.

व्वा..टीम इंडिया…व्वा! कम्माल केली!!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या