21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रराऊत यांची सकाळ खराब झाल्याचे बघून समाधान

राऊत यांची सकाळ खराब झाल्याचे बघून समाधान

एकमत ऑनलाईन

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर भाजपा नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांना टोला मारला आहे. सगळ्यांची सकाळ खराब करणारे संजय राऊत यांची सकाळ खराब झाल्याचे बघून समाधान मिळते आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पत्राचाळमधील गरीब रहिवाशांना ख-या अर्थाने न्याय मिळेल. राऊत स्वत:ला फार मोठे समजायचे. ‘झुकेगा नही’ म्हणणा-या राऊतांची आता काय अवस्था आहे हे एकदा विचारा. भ्रष्टाचार, महिलांवर अत्याचार केल्यानंतर संजय राऊतांना वाटायचं त्यांना कधीच काहीही होणार नाही. ईडीची चौकशी आणि दुस-यांना त्रास देणे काय आहे हे आता त्यांना कळाले असेल, असे म्हणत नितेश राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

भ्रष्टाचार केला तर शिक्षा भोगावी लागणार
पत्राचाळ रहिवाशांची संजय राऊत आणि त्या बिल्डरनी मिळून फसवणूक केली आहे. या फसवणुकीची शिक्षा त्यांना मिळायला हवी. भ्रष्टाचाराची किंमत राऊतांना चुकवावी लागणार. तुम्ही भ्रष्टाचार केला असेल, पैशांची हेराफेरी, गरीब लोकांना फसवले असेल तर त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच.

सकाळी सकाळी येऊन राऊत इतरांची सकाळ खराब करायचे तो आव आता आणून दाखवा, अशी टीकाही नितेश राणेंनी राऊतांवर केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या