26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रसत्तार यांच्या प्रतिज्ञापत्राची चौकशी होणार

सत्तार यांच्या प्रतिज्ञापत्राची चौकशी होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : टीईटी परीक्षा घोटाळ्यात मुलांची नावे अल्यानंतर अडचणीत सापडलेल्या शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. टीईटी प्रकरणाची चर्चा थांबते न थांबते तोच आता सत्तारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे सत्तारांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे.

सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने मंत्री अब्दुल सत्तार यांची या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश पोलिसांना दिले असून ६० दिवसांत पोलिसांना या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल द्यावा लागणार आहे. सत्तार यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या शपथ पत्रात शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अहर्तेबाबत तफावत असलेली माहिती सादर केली होती. या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि इतरांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणात सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना सी.आर.पी.सी २०२ अंतर्गत तपासाचे आदेश दिले होते.

पोलिसांनी अभय दिले?
पोलिसांनी या प्रकरणाचा अहवालदेखील सादर केला होता. मात्र, फिर्यादींनी पोलिसांनी भ्रामक, त्रुटीयुक्त अहवाल देऊन अभय दिल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आता न्यायालयाने पुन्हा पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून ६० दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या