33.1 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home महाराष्ट्र शाळेची घंटा संभ्रमात

शाळेची घंटा संभ्रमात

जिल्ह्याजिल्ह्यांत वेगळे निर्णय, जिल्हा प्रशासनाला अधिकार दिल्याने गोंधळ

एकमत ऑनलाईन

मुंबई/औरंगाबाद : राज्यात ९ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग दि. २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे राज्यात शाळा सुरू करण्याची जोरदार तयारी सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि कर्मचाºयांच्या टेस्टही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षकही पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यातच कोरोनाच्या दुसºया लाटेचीही भीती आहे. दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढू लागल्याने आता शाळा सुरू करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात शाळा सुरू करण्याबाबत वेगळा विचार केला जात आहे आणि त्यातच पालकांचे संमतीपत्र घेण्याचा आदेशही राज्य शासनाने जारी केला आहे. त्यामुळे शाळेची घंटाच संभ्रमात असल्याचे चित्र आहे.

राज्य शासनाने दि. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील सर्वच शाळा कोरोना नियमावलीच्या आधीन राहून सुरू होणे गरजेचे होते. मात्र, ऐनवेळी कोरोनाची वाढती संख्या आणि पॉझिटिव्ह शिक्षकांची वाढती संख्या लक्षात घेता चिंता वाढली आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती लक्षात घेऊन राज्य शासनानेही ऐनवेळी सावध पवित्रा घेत शाळा सुरू करण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला बहाल केला आणि समन्वयाने शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले. यासोबतच पालकांची संमतीदेखील घेणे बंधनकारक केले. त्यामुळे सर्वत्र संभ्रम वाढला आहे. त्यामुळे शाळा २३ नोव्हेंबरला सुरू होणार का, याबाबत साशंकता आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद शहर वगळता अन्य जिल्ह्यांतील शाळा सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी सुरू करण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळे लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, उस्मानाबाद या शहरांतील शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पालकांची संमतीची अट आणि कोरोना पॉझिटिव्ह शिक्षक आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. उस्मानाबादमध्ये तर १०० च्या जवळपास शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. अन्य जिल्ह्यातही तपासण्या सुरू आहेत. त्यामुळे शाळेची घंटा वाजणार कशी, असा प्रश्न आहे. त्यातच औरंगाबाद शहरात ३ जानेवारीपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. त्यामुळे पालकही संभ्रमात आहेत.

एक तर मुंबई, ठाण्यात शाळा ३१ डिसेंबरपर्यंत सुरू होणार नाहीत, असा निर्णय महापालिकांनी घेतला आहे. त्यामुळे या शाळा नव्या वर्षांतच सुरू होणार आहेत. तसेच पुण्यातील शाळादेखील १३ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील शाळा ३० नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ग्रामीण भागात दि. २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत.

शहरी आणि ग्रामीण भागात वेगळे चित्र
राज्यात दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, कोरोनाच्या संकट काळात शहरी आणि ग्रामीण भागाचे वेगळे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह अन्य काही शहरांत शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला असला, तरी पुणे, पिंपरी-चिंचवडच्या ग्रामीण भागात वेळेत शाळा सुरू होणार आहेत. अन्य ठिकाणीही हाच आधार घेऊन शाळा सुरू होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांत सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लातूर जिल्ह्यात १० टक्के वगळता सर्व शाळा होणार सुरू
लातूर जिल्ह्यातील ६४७ पैकी ५४२ शाळांनी दि. २३ नोव्हेंबर रोजी नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच काही प्रमाणात पालकांनीही संमती दिली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या कोरोना चाचण्यांसोबतच शाळांचे निर्जंतुकीकरणही करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील १० टक्के शाळांतील शिक्षकांच्या तपासण्या आणखी बाकी आहेत. या तपासण्या २४ व २५ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. त्यामुळे या १० टक्के शाळा २६ नोव्हेंबरला सुरू होणार आहेत, तर बाकी सर्व शाळा २३ नोव्हेंबर रोजी सुरू होतील, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

जिल्ह्यात तीन ठिकाणी घरफोडी; लाखोंचे दागिन्यासह रोकड पळविली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या