नागपूर : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना जिल्हास्तरावर कठोर पावले उचलली जात आहेत. अमरावती आणि पुण्यासह अकोल्याने कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता निर्बंधांची घोषणा केलीच होती, त्यात आता नागपूरची भर पडली आहे. नागपुरात शनिवार, रविवार असे आठवड्यातील दोन दिवस बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राउत यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाºयांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी देशभर १३,९७९ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ९,४७६ रुग्ण बरे झाले आहेत. अर्थातच ४,४१२ सक्रीय रुग्णांची वाढ झाली आहे. ही वाढ ८७ दिवसांत सर्वाधिक आहे. तसेच रविवारी कोरोनामुळे ७९ जणांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी २५नोव्हेंबर रोजी ७,२३४ अॅक्टिव्ह रुग्ण वाढले होते. अॅक्टिव्ह किंवा सक्रीय रुग्ण म्हणजे असे रुग्ण की ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
नागपूर बैठकीत झालेले निर्णय
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ‘मी जबाबदार’ मोहिम नागपुरात राबविली जाणार, हॉटेल, रेस्तरला ५० टक्के क्षमतेपर्यंत परवानगी असेल, पण रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ते बंद असतील,धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रम ७ मार्चपर्यंत बंद राहतील़ मंगल कार्यालये, लॉन, रिसॉर्ट यांना २५ फेब्रुवारीपासून ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना़ कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करणार, चाचण्यांचे प्रमाण वाढवले जाणार, नागरिकांनी कुठलेही लक्षण आढळल्यास चाचणी करावी असे आवाहन
नागपुरात लॉकडाऊन नाही : नितीन राऊत
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. नागपुरातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परंतु नागपुरात तूर्तास तरी लॉकडाऊन केले जाणार नाही. मात्र कठोर निर्बंध लावले जातील, अशी माहिती उर्जामंत्री तथा नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. नागपूर शहरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे शहरातील बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या काळात जास्तीत जास्त ट्रेसिंग करुन तसंच कोरोना चाचण्या करुन साखळी तोडण्याचं काम आरोग्य विभाग करेल, असे ते म्हणाले आहेत.
ठाण्यात नियम न पाळल्यास दुकाने सील
कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कंबर कसली आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि मास्क वापरण्याच्या नियमांचा भंग केल्यास दुकाने आणि आस्थापना सील करा, असे आदेशच विपिन शर्मा यांनी दिले आहेत. त्यांनी ठाण्यातील परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना या आदेशांची सक्तीने अमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी
साताºया गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचे प्रमाण १००च्या आसपास आहे. एकंदरीत राज्यातील कोरोनाचा वाढताप्रादुर्भावे लक्षात घेऊन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
अचलपूरमध्ये घरोघरी कोरोना रुग्ण
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा आणि अचलपूरमध्ये कोरोनाची प्रचंड संख्या वाढली आहे. परतवाडा आणि अचलपूर तालुक्यात घरोघरी रुग्ण आढळत आहेत. अचलपूरमध्ये तर रुग्ण संख्या हाताबाहेर गेल्याने होम आयसोलेशन बंद करण्यात आले आहे. दोन्ही तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले असून संपूर्ण अमरावती जिल्ह्यातच आज रात्रीपासूनच कडक लॉकडाऊनची अमलबजावणी करण्यात येणार आहे.
विना मास्क वावरामुळे २४ हजारांचा दंड