34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमहाराष्ट्रपुण्यातील शाळा-महाविद्यालये १४ मार्चनंतरही बंद

पुण्यातील शाळा-महाविद्यालये १४ मार्चनंतरही बंद

एकमत ऑनलाईन

पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालये येत्या १४ मार्चनंतरही बंद ठेवण्यात येणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत तयारी करावी लागणार आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता निर्बंध लावण्याबाबत शुक्रवार, दि. १२ मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत शक्रवारी विधान भवन येथे कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थांकडून पाहणी अहवाल सादर करण्यात आला. यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत शास्त्रोक्त विश्लेषण करण्यात आले. याबाबत बोलताना सौरभ राव म्हणाले, सध्या शाळा-महाविद्यालये १४ मार्चपर्यंत बंदच आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागे शाळा-महाविद्यालये प्रमुख कारण आहे. त्यामुळे आयसर आणि टीसीएस या संस्थांनी शाळा-महाविद्यालये १४ मार्चनंतरही बंदच ठेवावीत अशी स्पष्ट शिफारस केली आहे. शाळा-महाविद्यालये बंद ठेवल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना फारसा त्रास होणार नाही परंतु दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत प्रशासनाची तयारी आहे.

शुक्रवारी होणाºया बैठकीत चर्चा झाल्यानंतर निर्बंधांबाबत अंतिम निर्णय होईल असेही सौरभ राव म्हणाले. हॉटेल, रेस्टॉरंट, बीअर बार बंद करून केवळ पार्सल सेवा सुरू ठेवणे, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने, चित्रपटगृहे, मॉल, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री बंद ठेवणे या पर्यायांची अंमलबजावणी केल्यास रुग्णसंख्या किती घटणार आहे याचे विश्लेषण या अहवालात केले आहे. त्यावर शुक्रवारी होणाºया बैठकीत चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

परभणी जिल्ह्यातील शाळा १५ मार्चपर्यंत बंद
परभणी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळून इतर सर्व वर्ग १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे नवीन आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दि़ ६ मार्च रोजी दिले. परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. तसेच काही शाळांमध्ये शिक्षक पॉझिटिव्ह आले. कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व माध्यमे व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी व अकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात सात मार्चपर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेश यापूर्वी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले होते. कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता सोमवार, १५ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश शनिवारी नव्याने देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व माध्यमे व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी व अकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात १५ मार्चपर्यंत बंद करण्यात येत आहेत. इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग नियमित सुरू राहतील.

अखेर नायगावात दारूची बाटली झाली आडवी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या