मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अन्य क्षेत्रांसह शाळाही बंद होत्या. मात्र, आता विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठीही योग्य ती संपूर्ण जबाबदारी घेऊन राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज (७ नोव्हेंबर) जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे, कोरोनाच्या दुस-या लाटेची शक्यता आणि दिवाळी या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस अधिक जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचेही मुख्यमंर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अनलॉकदरम्यान प्रत्येक क्षेत्र खुले करताना जबाबदारीने वागणे हे या काळात अत्यंत आवश्यक आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळी नंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना क्रिष्णा इ. उपस्थित होते. यावेळी राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णयासह मुख्यमंर्त्यांनी काही सूचनाही केल्या आहेत. शाळांचे सॅनिटायझेशन, शिक्षकांची कोरोना चाचणी यासह सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक असून खबरदारीचा उपाय म्हणून एखादा विद्यार्थी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीची प्रकृती ठीक नसल्यास पालकांनी आपल्या पाल्यास शाळेत पाठवू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
अमेरिकेत रुग्णसंख्येचा जागतिक विक्रम