34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमहाराष्ट्रपुण्यातील शाळा १४ मार्चपर्यंत बंद

पुण्यातील शाळा १४ मार्चपर्यंत बंद

एकमत ऑनलाईन

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुण्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद होते. त्याचप्रमाणे रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी देखील होती. तरी देखील शहरातील कोरोनाचे संक्रमण थांबण्याचे नाव घेत नाही. शहरातील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्याच्या महापौरांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीबद्दल आणि त्यासंदर्भात केल्या जाणाºया कारवाईबाबत माहिती दिली. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी असे म्हटले आहे की, १४ मार्चपर्यंत या शहरातील सर्व महाविद्यालये, शाळा, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात येत आहेत. शिवाय रात्री अकरा ते सकाळी सहापर्यंत जे संचार निर्बंध आहेत, ते देखील १४ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखता येईल, त्यावर नियंत्रण ठेवता येईल या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर म्हणाले.

दरम्यान पुण्यातील मंदिरांवर देखील कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळतो आहे. राज्यात अनलॉक प्रक्रियेच्या अंतर्गत मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली होती. मात्र कोरोना विषाणू पुन्हा फोफावत असल्याचे लक्षात घेऊन राज्य सरकारने योग्य ते कठोर नियम लागू करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर २ मार्च रोजी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे, असे असले तरीही खबरदारीसाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने भाविकांनी बाप्पांचे आॅनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहन केले जात आहे.

तीन ठिकाणी कोव्हिड सेंटर
पुणे शहरात काल तर एकाच दिवशी जवळपास कोरोनाचे ७०० रुग्ण आढळून आले. रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तीन ठिकाणी महापालिका कोव्हिड सेंटर सुरू करणार आहे. तिन्ही सेंटरवर ५०० बेड्स उपलब्ध होणार आहेत. तसेच गरज पडल्यास पुन्हा जम्बो कोव्हिड सेंटरही सुरू करणार असल्याची माहिती अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिली आहे. पुणे महापालिकेने खासगी रुग्णालयांना बेडसंदर्भात सूचना देताना शहरातील ५० टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

निलंगा, चाकूर, जळकोट येथे कडकडीत बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या