16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रगायी आडव्या आल्याने वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसला सलग दुसरा अपघात

गायी आडव्या आल्याने वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसला सलग दुसरा अपघात

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणा-या हायटेक वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसला सलग दुस-या दिवशी गायी आडव्या आल्याने अपघात झाला आहे. मात्र, या दुर्घटनेत कोणतीही जीवित आणि वित्तय हानी झाली नाही; मात्र, सलग दुस-या घटनेनंतर म्हशीं मालकाविरोधात रेल्वे पोलिसांनी रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम १४७ अंतर्गत गुन्ह्याची नोंदविला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई ते अहमदाबाद दरम्यान अत्याधुनिक – हायटेक वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून सुरू केली होती. या गाडीला सुरू होऊन एक आठवड्यात सुद्धा झालेला नाही. तर सलग दोनदा वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. पहिला अपघात गुरूवारी झाला. ज्यामध्ये ट्रेन क्रमांक २०९०१ वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस मुंबईहून अहमदाबादला येत होती. यादरम्यान वटवा ते मणिनगर स्थानकाजवळ म्हशींचा कळप रेल्वे मार्गावर आला. वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसची आणि म्हशींची जोरदार धडक झाली. या धडकेत चार म्हशीं ठार झाल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या