33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home महाराष्ट्र ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीसाठी मुंबईतील दोन हॉस्पिटलची निवड

ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीसाठी मुंबईतील दोन हॉस्पिटलची निवड

एकमत ऑनलाईन

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनावरच्या ऑक्सफर्डच्या लसीची मानवी चाचणी आता मुंबईतही होणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटशी करार झाला आहे. भारतामध्ये ऑक्सफर्डची लस यशस्वी झाली तर त्याचं उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट करणार आहे.

कोव्हिशिल्ड या सिरमच्या लसीशीची चाचणी लवकरच भारतात सुरू होणार आहे. देशभरातल्या एकूण १० सेंटरमध्ये १६०० निरोगी लोकांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे. देशातल्या १० सेंटरपैकी मुंबईत केईएम हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलची या कोरोना चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. केईएम आणि नायर हॉस्पिटलमध्ये १६० स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी करण्यात येईल. आयसीएमआरच्या सूचनांनुसार या चाचण्या होतील. या चाचणीचा पहिला टप्पा इंग्लंडमध्ये पार पडला आहे. दुसरी चाचणी इंग्लंडमधील १० हजार लोकांवर सुरू आहे, तसंच अमेरिका आणि ब्राझील या देशातही या लसीची चाचणी घेण्यात येईल.

देशातील १० केंद्रांवर या लसीचे मानवी प्रयोग होतील. प्रयोगाची ही दुसरी व तिसरी चाचणी आहे. पुढील आठवड्यापासून प्रयोग सुरू होईल. देशभरातील १,६०० व्यक्तींवर तर केईएम रुग्णालयातील १६० व्यक्तींवर या लसीची चाचणी करण्यात येईल. केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने केईएम रुग्णालय प्रशासनाला पत्राद्वारे या लसीच्या प्रयोग चाचणीविषयी कळविले आहे. त्यानुसार राज्याच्या कोविड टास्क फोर्सच्या नेतृत्वाखाली या लसीची चाचणी करण्यात येईल. डॉ. देशमुख म्हणाले, ही लस कोविड न झालेल्या २० ते ५० वयोगटातील व्यक्तींना देण्यात येईल. ज्यांच्या शरीरात कोरोनाविरोधातील प्रतिपिंडे तयार झाली आहेत, त्यांना या चाचणीत समाविष्ट केले जाणार नाही. चाचणीतून अति तरुण, अतिवृद्धांना वगळण्यात येईल. ब्रिटनमध्ये या चाचणीचा पहिला टप्पा पार पडला.

आदित्य ठाकरे टार्गेट, पार्थवरून महाभारत !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या