18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रपृथ्वीवर येण्यासाठी पैसे पाठव

पृथ्वीवर येण्यासाठी पैसे पाठव

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रेमात लोक किती आंधळे होतील याचा काही नेम नाही. म्हणजे एखादा व्यक्ती प्रेमात पडला तर तो विचारही करत नाही. पण ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडला, ती व्यक्ती जर ठग निघाली तर? मग हे आंधळेपणाने केलेले प्रेम किती महागात पडते याचा विचार करायला नको. अशाच प्रकारची प्रचिती एका जपानी महिलेला आली आहे.

आपण रशियन अंतराळवीर असून पृथ्वीवर पोहोचण्यासाठी आपल्याला पैशांची गरज आहे, मग आपण लग्न करू असे सांगत या ठगाने संबंधित महिलेला २५ लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. जपानमध्ये शिगा प्रांतात राहणा-या ६५ वर्षीय महिलेचा इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीची ओळख झाली. या व्यक्तीची प्रोफाईल आणि इतर फोटो हे अंतराळवीराचे असल्याचे दिसून येत होते. त्यावरुन ती महिला त्या व्यक्तीवर चांगलीच भाळली. नेमका याचाच फायदा त्या ठगाने घेतला आणि त्या महिलेशी चॅटिंग सुरू केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या