29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रनिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ घरी पाठवा - राजेश टोपे यांचे आदेश

निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ घरी पाठवा – राजेश टोपे यांचे आदेश

एकमत ऑनलाईन

जालना: संपूर्ण राज्यात कोरोनाच्या दुस-या लाटेने मोठा कहर निर्माण केला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे एका व्यक्तीपासून अनेकांना संसर्ग होत असल्याने सर्वच जिल्हा प्रशासनांनी खबरदारीचे उपाय घेतले आहेत. जालन्यातही मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यातील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना तातडीने घरी पाठवण्याचे निर्देशच जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन केले होते़

रेमडेसिवीरचा काळाबाजार होऊ देऊ नका
कोरोनाबधित रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणा-या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरेशा प्रमाणात जिल्ह्यात साठा उपलब्ध राहील यासाठी याची पुरेशी मागणी नोंदविण्यात यावी. जिल्ह्यात उपलब्ध होणा-या प्रत्येक इंजेक्शनचा हिशोब ठेवण्यात यावा. इंजेक्शन्स सर्व सामान्यांना चढ्या भावाने विक्री होणार नाही तसेच याचा काळाबाजार होणार नाही तसेच जिल्ह्यात रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्या, असे निर्देश टोपे यांनी दिले.

कोरोना मृत्यू होऊ देऊ नका
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिराने रुग्णालयात भरती होत असल्याने त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांची प्रकृती खालावत असून अनेकप्रसंगी रुग्णांचा मृत्यूही होत आहे. ही अतिशयचिंतेची बाब आहे. सर्वसामान्य नागरिक सर्दी, ताप, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानाही याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये न ठेवता त्यांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यावर भर देण्यात येऊन कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगारांना प्रशिक्षण द्या
कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यादृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या ४०० बेडव्यतिरिक्त अधिकच्या २५० ऑक्सिजन बेडची निर्मिती करण्यात येत असलेले बेड रुग्णांसाठी तातडीने उपलब्ध होतील, यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य तसेच डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार यांना प्रशिक्षण देण्यात यावे.

कोरोना बाधितांच्या सहवासितांचा डाटा ठेवा
जालना जिल्ह्यात ट्रेसिंग व टेस्टिंगची संख्या वाढविण्यात यावी. जालना जिल्ह्यासाठी स्वतंत्र अशी आरटीपीसीआर लॅब असून या लॅबची दरदिवसाची क्षमता एक हजारपेक्षा अधिक स्वॅब तपासणीची असून दरदिवशी त्या प्रमाणात चाचण्या झाल्याच पाहिजेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाव्यतिरिक्त जालना शहरामध्ये अधिक प्रमाणात स्वॅब संकलन केंद्र उघडण्याच्या सूचना करत कोरोना बाधितांच्या संपर्कामधील सहवासितांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात यावा. ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जिल्ह्यात दररोज किमान २५ हजार नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात यावे. रविवारीसुद्धा लसीकरण होईल, याची दक्षता घेत लसीकरणामध्ये जालना जिल्हा महाराष्ट्रामध्ये अग्रेसर राहावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या