26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeमहाराष्ट्रसेन्सेक्स ४२० अंकांनी घसरला

सेन्सेक्स ४२० अंकांनी घसरला

एकमत ऑनलाईन

मुंबई : जागतिक पातळीवरील चढ उतारामुळे गुरुवारी देशांतर्गत बाजार घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स ४१९.८५ अंकांनी घसरून ६०,६१३.७० वर बंद झाला. निफ्टी १२८.८० अंकांनी घसरून १८०२८.२० वर बंद झाला. बँकिंग समभागांमध्ये विक्री झाली, सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर अमेरिकन बाजार २ ते २.५ टक्क्यांच्या दरम्यान घसरले.

डाऊ जोन्स ६५० अंकांनी तर नॅस्डॅक २६० अंकांनी घसरून दिवसभराच्या खालच्या पातळीवर बंद झाला. त्याच वेळी, एसजीएक्स निफ्टीमध्येही घसरण दिसून आली. सुमारे ५० गुणांच्या घसरणीसह १८,१५० च्या आसपास आहे. त्याचा परिणाम गुरुवारी देशांतर्गत बाजारावर दिसून येईल. याआधी बुधवारीही भारतीय बाजार घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स जवळपास १५० अंकांच्या घसरणीसह आणि निफ्टी ४६ अंकांच्या घसरणीसह बंद झाला.बाजारातील घसरणीमुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. बँंिकग, ऑटो, ऑटो, एफएमसीजी, फार्मा, धातू, ऊर्जा, मीडियासह रिअल इस्टेट क्षेत्रातील समभाग घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या ५० समभागांपैकी १२ समभाग वधारले तर ३८ समभाग घसरले. त्याच वेळी, सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी ७ समभाग वाढीसह आणि २३ समभाग घसरणीसह बंद झाले.

बाजारात एकूण ३,५९२ शेअर्सचे व्यवहार झाले, त्यात १,२७१ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर २,१९१ शेअर्स घसरून बंद झाले. १२६ च्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप २८१.६१ लाख कोटी रुपये आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या