25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्र‘सीरम’ने महाराष्ट्राला लस देताना झुकते माप द्यावे

‘सीरम’ने महाराष्ट्राला लस देताना झुकते माप द्यावे

एकमत ऑनलाईन

मुंबई : सीरम इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्राच्या पुण्यात आहे़ त्यामुळे अदर पूनावाला यांनी लस देण्याच्याबाबतीत महाराष्ट्राला काहीसे झुकते माप द्यावे, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राज्यात सध्या कोरोना संसर्ग वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाच्या तिसºया टप्प्यालाही सुरूवात झाली आहे. मात्र, लस तुटवड्यामुळे राज्य सरकारकडून हा लसीकरणाचा टप्पा राबवताना अडथळे येत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री टोपेंनी सीरमचे पूनावाला यांना ही विनंती केल्याचे दिसत आहे.

अदर पूनावाला यांना आमची विनंती आहे की, ते पुण्यातील असल्याने व महाराष्ट्रातच सीरम इन्स्टिट्यूट असल्याने, काहीही करून सीरम इन्स्टिट्यूटने झुकते माप हे महाराष्ट्राला दिले पाहिजे, असे राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच, कुठल्याही पद्धतीने आम्हाला लसीकरण १८ ते ४४ असेल, यासाठी लागणारी किंमत ही राज्य सरकार लगेच द्यायला तयार आहे. परंतु आपल्याला अधिक जास्त झुकतं माप मे व जून महिन्यात असलायला हवे. जेणेकरून आपल्याला अधिक गतीने लसीकरण करता येईल. आज लस उपलब्ध नसल्याने, आपल्या जवळ निधी आहे आपण खर्च करायला तयार आहोत, विकत घ्यायला तयार आहोत पण उपलब्ध नसल्याने आज आपल्याला १८ ते ४४ वयोगाटातील लसीकरण ते कमी गतीने करावे लागत आहे, असेही यावेळी राजेश टोपेंनी सांगितले.

लातूर जिल्ह्यासाठी २५ व्हेंटीलेटर उपलब्ध

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या