35.2 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमहाराष्ट्रकुंद्राच्या घरातून सर्व्हर, ७० पॉर्न व्हीडीओ जप्त

कुंद्राच्या घरातून सर्व्हर, ७० पॉर्न व्हीडीओ जप्त

एकमत ऑनलाईन

मुंबई : पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी राज कुंद्रा, त्याचा साथीदार आणि मुख्य आरोपी उमेश कामत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. या दोघांची पोलिस चौकशी करत आहेत. या चौकशीच्यावेळी गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी राज कुंद्राच्या घरी छापा घातला. या छाप्यामधून त्यांनी घरातील सर्व्हर आणि उमेश कामतने तयार केलेले ७० पॉर्न व्हीडिओ जप्त केले आहेत.

गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व व्हीडिओ वेगवेगळ््या प्रॉडक्शन हाऊसच्या मदतीने बनवण्यात आले होते. त्याशिवाय हॉट शॉट अ‍ॅपवर अपलोड केलेले २० ते ३० मिनिटांचे सुमारे ९० व्हीडिओदेखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. मुंबई गुन्हे शाखेने राजची चौकशी केली असता या व्हीडिओबद्दल त्याने माहिती दिली. हे व्हीडिओ उमेश कामतने युकेमधील प्रॉडक्शन कंपनी केनरिनला पाठवले होते.

पोलिसांनी सर्व्हर जप्त केले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहे. त्यातून केनरिनसाठी पॉर्नोग्राफी मटेरिअल अपलोड केले जात होते की नाही, हे समजू शकणार आहे. दरम्यान, आपण पॉर्न व्हीडिओ नाही तर अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणा-या इरॉटिक व्हीडिओप्रमाणेच व्हिडिओ तयार करत असल्याचा दावा राज कुंद्रा सातत्याने त्याच्या चौकशीत करत आहे.

आज झालेल्या चौकशीदरम्यान मुंबई गुन्हे शाखेने उमेश कामत याने युके स्थित प्रॉडक्शन कंपनी केनरीनला पाठविलेल्या व्हीडीओबाबत राज कुंद्रा याने दुजोरा दिला आहे, असे सांगितले. तो स्वत: केनरिनसाठी अश्लिल व्हीडीओ अपलोड करीत होता की नाही, हे शोधण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी राज कुंद्राच्या घरचे सर्व्हर पाठविले आहे. सध्या राज कुंद्राची चौकशी सुरू असून, पॉर्न व्हीडीओ सापडल्याने त्याचा पाय खोलात गेला असून, त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, त्याला २३ जुलैपर्यंत कोठडी सुनावल्याने शुक्रवारी त्याच्या कोठडीत आणखी वाढ होऊ शकते.

रॅकेटमध्ये कुंद्राचा सहभाग
सखोल चौकशीदरम्यान राज कुंद्राचा साथीदार आणि आयटी हेड रायन थॉर्पने या संपूर्ण रॅकेटमध्ये कुंद्राची मुख्य भूमिका असल्याचे तपास अधिका-यांना सांगितले. तांत्रिक गोष्टींसह सावधगिरी बाळगून ते कायद्यापासून कसे मुक्त होऊ शकतात, हे इतर कर्मचा-यांना सांगणे रायनचे काम होते. राज कुंद्राच्या वियान इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एलजी स्ट्रीमिंग या दोन कार्यालयांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे.

अटक टाळण्यासाठी कुंद्राने दिले २५ लाख?
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली. राजला २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपीने एक मोठा खुलासा केला आहे. राज कुंद्राने अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला २५ लाख रुपयांची लाच दिली असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात अरविंद श्रीवास्तव ऊर्फ यश ठाकूरही आरोपी आहे. त्याने ईमेलद्वारे मार्च महिन्यात एसीबीने याबाबतची तक्रार केली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात एसीबीने ही तक्रार मुंबई पोलिस कमिश्नरच्या ऑफिसमध्ये पाठवली होती. दरम्यान शहरातील पोलिस अधिकारी यावर काहीच भाष्य करायला तयार नाहीत. बुधवारी गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या अंधेरीतील कार्यालयात छापा टाकला होता.

पर्यटकांना भुरळ घालणा-या सहस्त्रकुंड धबधब्याने केले रौद्ररूप धारण

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या