24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रसात साखर कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस

सात साखर कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे सहकारी साखर कारखाने त्यांच्या विधानसभा क्षेत्रात आहेत. तसेच काही राजकीय नेत्यांचे साखर कारखाने राज्यात अनेक ठिकाणी आहेत. दरम्यान आता राज्य साखर आयुक्तालयाने राज्यभरातील ७ साखर कारखान्यांना आरआरसीनुसार नोटीस बजावल्या आहेत. ७० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे कारखाने असून त्यांनी एकूण १४५०३.५९ लाख आरआरसी रक्कम थकवली आहे. यात प्रामुख्याने राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आल्याचे दिसून येते. साखर आयुक्तांनी राज्यभरातील ७ साखर कारखान्यांना दणका दिला आहे.

सात कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, पंढरपूर (आरआरसी रक्कम ३६७४.९० लाख), पुणे जिल्ह्यातील भोरचे कॉंग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचा राजगड सहकारी साखर कारखाना लि. (आरआरसी रक्कम २५९१.६९ लाख), माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अंबाजोगाई येथील बीड-अंबेजोगाई सहकारी साखर कारखाना (आरआरसी रक्कम ८१४.१५), माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी (आरआरसीसी रक्कम – ४६१५.७५ लाख), उस्मानाबाद जिल्ह्यातील नितळी येथील भाजपचे विजयकुमार दंडनाईक यांचा जयलक्ष्मी शुगर (आरआरसी रक्कम – ३४०.६९ लाख), सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील यांचा किसनवीर ससाका भुईंज (आरआरसी रक्कम-४११.९१ लाख) आणि नगर जिल्ह्यातील भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्या सईकृपा साखर कारखाना, हरिडगाव, (आरआरसी रक्कम -२०५४.५० लाख) यांना ही नोटीस बजावली. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या