36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रदिव्यांग शाळेतील कर्मचा-यांना सातवा वेतन

दिव्यांग शाळेतील कर्मचा-यांना सातवा वेतन

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना आता भरघोस वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही सुवार्ता त्यांच्यासाठी दिली आहे. विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात धनंजय मुंडेंनी ही घोषणा केली. निर्णयाची अंमलबजावणी दोन महिन्यांच्या आत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शिक्षकांना देण्यात येणारे समकक्ष वाढीव अनुदान, भत्ते यांसह अन्य प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य विभागांसमवेत व्यापक बैठका घेऊन ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भातील सर्व अडसर दूर करणार आहे. दोन महिन्यांच्या आत ७ वा वेतन आयोग लागू करण्यात येईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली.

आ. डॉ. सुधीर तांबे, आ. शरद रणपिसे, आ. भाई जगताप, आ. जयंत पाटील, आ. कपिल पाटील, आ. विक्रम काळे, यांसह विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर अत्यंत सकारात्मक चर्चा करत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी ७ वा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील माहिती सभागृहाला दिली.

१५ दिवसांत व्यापक बैठक
काँग्रेस नेते भाई जगताप, आ. जयंत आसगावकर यांनी ६ वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सातव्या वेतन आयोग लागू करण्यादरम्यानच्या कालावधीत आलेल्या अडचणींच्या संदर्भात मंत्री महोदयांचे लक्ष वेधले. त्यावेळी मंत्री मुंडे यांनी दिव्यांग शाळेतील शिक्षकांना अन्य शिक्षकांच्या तुलनेत मिळणारे शंभर रुपये वाढीव अनुदान व त्यातील समकक्ष दुवे यातील फरक स्पष्ट करत, हे अडसर दूर व्हावेत व दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना अन्य विभागातील कर्मचा-यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार वेतन मिळावे यासाठी अर्थ व नियोजन खात्यासह संबंधित विभागांसोबत व्यापक बैठक घेण्याचे सुतोवाच केले. अधिवेशनानंतर पंधरा दिवसांच्या आत संबंधित विभागांसोबत व्यापक बैठक घेऊन हे अडसर दूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष ज्युनिअर कॉलेज
दिव्यांग शाळांमधील दहावी पास विद्यार्थ्यांना, मुख्यत: कर्णबधिर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अडचणींना सामोरे जावे लागते. यावर राज्य शासन अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेष ज्युनिअर कॉलेज उपलब्ध करून देणार का, हा प्रश्न आ. कपिल पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावर मुंडे यांनी राज्य सरकार दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष ज्युनिअर कॉलेज उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक असून, याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडणार असल्याचे प्रतिपादन केले.

पंत च्या शतकामुळे यजमानांना ८९ धावांची आघाडी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या