22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रशंकरराव गडाख यांच्या मणक्याला दुखापत , थेट रुग्णालय गाठले

शंकरराव गडाख यांच्या मणक्याला दुखापत , थेट रुग्णालय गाठले

एकमत ऑनलाईन

मुंबई: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे.

त्यामुळे दोन्ही बाजुंकडून आपल्या आजारी असलेल्या आमदारांनाही मतदानासाठी बोलावण्यात आले आहे. यावेळी महाविकास आघाडीचे मंत्री शंकरराव गडाख यांना तर मतदान केंद्रातून थेट रुग्णालयात जावे लागले. शंकरराव गडाख हे विधानपरिषदेच्या मतदानासाठी मुंबईच्या दिशेने येत असताना रस्त्यावर त्यांची गाडी स्लीप झाली. त्यामुळे शंकरराव गडाख यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे गडाख यांच्या पाठीत तीव्र वेदना जाणवत होत्या.

मात्र, विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान करणे भाग असल्याने सोमवारी सकाळी शंकरराव गडाख विधानभवनात आले. यावेळी ते आपल्या सहका-यांच्या खांद्यावर हात ठेवून आधार घेऊन चालत होते. त्यांना एक-एक पाऊल टाकतनाही वेदना जाणवत होत्या. त्यामुळे शंकरराव गडाख कसेबसे हळुहळू चालत मतदान केंद्रापर्यंत पोहोचले. मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर शंकरराव गडाख यांनी थेट रिलायन्स रुग्णालय गाठले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या