23.3 C
Latur
Saturday, August 8, 2020
Home महाराष्ट्र शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन

शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे (७४) यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. त्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्यावर रविवार दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता पार्थपूर ता. अंबड, जि. जालना या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तथा राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय राजेश टोपे यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई अंकुशराव टोपे यांचे निधन हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी आदरणीय शारदातार्इंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे म्हटले.

आपल्या आईबरोबरचा अखेरचा संवाद राजेश टोपेंनी ट्विट करून सांगितला आहे.

४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आशीर्वाद दिले. तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, अशा भावना राजेश टोपेंनी व्यक्त केला आहे.

राजेश टोपे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, ‘ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती.दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आशीर्वाद दिले. तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील’

Read More  गोड छकुलीचा एक व्हिडिओ : कोरोना संपल्यावर फिरायला जायचयं…..

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,136FansLike
92FollowersFollow