26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रओबीसी आरक्षणासाठी शिंदे-फडणवीस सरकार यावे लागले

ओबीसी आरक्षणासाठी शिंदे-फडणवीस सरकार यावे लागले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राज्यात ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले होते. या आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून न्यायालयाने बांठिया अहवालानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यावर आता सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येत असून ओबीसी नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाची लढाई ब-यापैकी आम्ही जिंकलो आहोत. मात्र यासाठी उद्धव ठाकरे आणि अजित पवार सरकार जाऊन एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकार यावे लागले.

योग्य पद्धतीने हाताळणी आणि चांगले वकील लावणे महत्त्वाचे होते. मी आधीच सांगितले होते की, ओबीसी आरक्षण केवळ देवेंद्र फडणवीस मिळवून देऊ शकतात. तेच झाले. फडणवीसांनी आमच्यासोबत संघर्ष केल्यामुळे आरक्षण मिळाल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या