21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे-फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार १२ जुलै रोजी ?

शिंदे-फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार १२ जुलै रोजी ?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सगळ्यांचे लक्ष नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर लागले आहे. या नव्या सरकारच्या मंर्त्यांचा शपथविधी कार्यक्रम १२ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवसानंतर विधीमंडळाचे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या आधीच नवीन मंत्री आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात खाते वाटपावर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १२ जुलैला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये येत्या दोन दिवसात खाते वाटपावर चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महत्त्वाची खाती शिंदे गटाला मिळणार आहे. भाजपकडे गृह, महसूल खाते जाण्याची शक्यता आहे. तर, शिंदे गटाकडे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खाते जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

वर्ष २०१४ ते २०१९ दरम्यानच्या काळात भाजप-शिवसेना युतीच्या काळात गृह, महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खाते भाजपकडे होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृह खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे, महसूल खाते काँग्रेसकडे, नगरविकास खाते शिवसेनेकडे होते.

दरम्यान, याआधी समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील चर्चेनुसार, दर ६ आमदारांमागे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्रानुसार भाजपला फायदा होणार आहे. भाजपला या सूत्रानुसार २८ मंत्रिपदे मिळणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या