25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे-फडणवीस सरकार अस्थिर

शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर

एकमत ऑनलाईन

पुणे : एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २४ तास जनतेसाठी उपलब्ध असल्याचे सांगत असले तरी विरोधक हे सरकार किती असंवेदनशील आहे हे जनतेच्या लक्षात आणून देत आहे. खा. सुप्रिया सुळे यांनी तर अनोख्या पध्दतीनेच सरकारची कार्यपध्दती सांगितली. हे सरकार विमानात फिरत आहेत, हॉटेलात बसत आहे अन अडीच हजाराची दाढी कटींग करत आहे असे म्हणत त्यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.

बंडखोरीच्या दरम्यान या सरकारचे कारनामे ही जनता विसरणार नाही. आता जरी हे जनतेचे सेवक असल्याचे सांगत असले तरी त्यांचा स्वार्थ हा काही लपून राहिलेला नाही. पण तेच आता विठ्ठलाचा आशिर्वाद घेण्यासाठी आल्याचे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच टार्गेट केले आहे. सरकार हे अस्थिर आहे पण खरे रुप लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना हा एक मित्रपक्ष झाला आहे. त्यामुळे शिवसेनेला साथ दिली आहे आणि भविष्यातही सेनेबरोबरच राहणार आहोत. आता ज्या नेतृत्वाला जबाबदार धरुन हे आमदार बंड करीत आहेत त्याच उद्धव ठाकरे यांना खुद्द बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवले होते.

आता त्यांनाच दुखावणे म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांना दुखवलवल्यासारखे असल्याचेही सुळे म्हणाल्या. सरकारकडून जे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे तसे प्रत्यक्षात नसल्याने हे सरकार कधीही अस्थिर होऊ शकते. शिवाय सर्वसामान्य जनतेला घेऊन केवळ घोषणांचा पाऊस आहे प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यावरच खरे रुप समोर येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या