22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रनवी मुंबईत शिंदे गटाचा दबदबा सुरू

नवी मुंबईत शिंदे गटाचा दबदबा सुरू

एकमत ऑनलाईन

मुंबई : सत्तांतरानंतर शिवसेनेला रामराम करून अनेकांनी शिंदे गटाची साथ देणं पसंत केले आहे. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीलादेखील खिंडार पडण्यास सुरुवात झाली असून राष्ट्रवादीतील दोन माजी नगरसेवकांनी आणि १० तालुकाध्यक्षांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईत शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. हा शरद पवारांसह राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे आणि माजी नगरसेविका स्वप्ना गावडेंसह तालुकाध्यक्षांनी राष्ट्रवादीला रामराम करून शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. अलीकडेच अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

नवी मुंबईत एकेकाळी होती राष्ट्रवादीची ताकद
गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाची नवी मुंबईतील ताकद कमी झाली असून एकेकाळी राष्ट्रवादीचे नवी मुंबई महापालिकेवर एकहाती वर्चस्व होते. यामागे गणेश नाईकांचा मोठा वाटा होता. मात्र, त्यांनी पक्ष सोडल्यानंतर राष्ट्रवादीची नवी मुंबईतील ताकद कमी झाली होती. त्यात आता अशोक गावडेंनीदेखील राष्ट्रवादीला रामराम केला आहे. त्याचा आणखी फटका राष्ट्रवादीला बसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, गावडेंच्या प्रेवशामुळे शिंदे गटाची नवी मुंबईतील ताकद वाढणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या