23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रसल्लागार समितीवर शिंदे गटालाच प्रतिनिधित्व

सल्लागार समितीवर शिंदे गटालाच प्रतिनिधित्व

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीवर शिंदे गटाला शिवसेना म्हणून प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. त्यामुळे समितीवर अधिकृत शिवसेनेच्या सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसेना गटनेते अजय चौधरी, पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन केली.

विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक आज झाली. समितीवर सर्व पक्षांच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र अधिकृत शिवसेना सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. आज विधानभवनात महाविकास आघाडीतील विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी हा विषय उपस्थित केला. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षातील सदस्यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना हा अधिकृत पक्ष असून आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे व न्यायालयात यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या नियम १६४ नुसार शिवसेनेचे सदस्य समितीवर नेमण्यात यावेत, अशी मागणी गटनेते अजय चौधरी यांनी केली.

उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद कामकाज सल्लागार समितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाजपचे प्रवीण दरेकर, विजय गिरकर, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, कॉंग्रेसचे भाई जगताप तर निमंत्रित सदस्य म्हणून चंद्रशेखर बावनकुळे, रणजितसिंह मोहिते पाटील, जयंत पाटील (शेकाप), कपिल पाटील, विलास पोतनीस यांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या