26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदेंनी राज्यपालांचा राजीनामा मागावा

शिंदेंनी राज्यपालांचा राजीनामा मागावा

एकमत ऑनलाईन

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राजकीय स्तरातून टीका करण्यात येत आहे. त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही शिवरायांचा अपमान केला तरी तुम्ही शांत का? शिवरायांचा अपमान तुम्ही शांतपणे सहन कसा काय करू शकता? एकनाथ शिंदेजी, जरातरी नैतिकता उरली असेल तर राजीनामा द्या असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबाला पत्र लिहून माफी मागितली असे म्हणत सुधांशू त्रिवेदींनी म्हंटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी माफी मागितली? हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले पाहिजे असेही राऊत म्हणाले आहेत.

छत्रपतींबाबत राज्यपाल कोश्यारींनी पुन्हा एकदा दळभद्री विधान केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आहे. तुम्ही शांत कसे? असा सवाल राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या