27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रश्रीकांत शिंदे यांचे ठाण्यात शक्तिप्रदर्शन

श्रीकांत शिंदे यांचे ठाण्यात शक्तिप्रदर्शन

एकमत ऑनलाईन

ठाणे : आज दुपारी चार वाजता ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर त्यांचे समर्थक जमणार आहेत. यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. ठाण्याचे सर्वार्थाने पालक असलेल्या एकनाथ शिंदे साहेबांना आपले समर्थन देऊया. शिंदे साहेबांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्यासाठी २५ जून रोजी दुपारी ४.०० वाजता साहेबांच्या निवासस्थानी जमूया, असे मेसेजेस शिंदे समर्थकांकडून पाठवले जात आहेत.

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर शिवसेना टप्प्याटप्प्याने आक्रमक होताना दिसत आहे. सुरुवातीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आज बंडाच्या पाचव्या दिवशी एकनाथ शिंदे गट माघार घ्यायला तयार नसल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी झालेल्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत शिवसैनिकांना आक्रमकपणे किल्ला लढवण्याचा आदेश दिला होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे सरकारला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शनिवारी दुपारी एकनाथ शिंदे समर्थकांकडून ठाण्यात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

आज दुपारी चार वाजता ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर त्यांचे समर्थक जमणार आहेत. यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. ठाण्याचे सर्वार्थाने पालक असलेल्या एकनाथ शिंदे साहेबांना आपले समर्थन देऊया. शिंदे साहेबांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्यासाठी २५ जूनला दुपारी ४.०० वाजता साहेबांच्या निवासस्थानी जमूया, असे मेसेजेस शिंदे समर्थकांकडून पाठवले जात आहेत. त्यामुळे आज दुपारी चार वाजता ठाण्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या