25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रठाकरेंना उत्तर देण्यासाठी शिंदेंची हिंदू गर्व गर्जना यात्रा

ठाकरेंना उत्तर देण्यासाठी शिंदेंची हिंदू गर्व गर्जना यात्रा

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आता राज्यात हिंदू गर्व गर्जना यात्रा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही यात्रा २० सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे समजते. २० सप्टेंबरपासून ३० सप्टेंबरपर्यंत ही यात्रा सुरू राहील. एकीकडे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद आणि निष्ठा यात्रेचा पाचवा टप्पा १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आदित्य ठाकरेंच्या यात्रेला हे उत्तर असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या या यात्रेत त्यांच्या समर्थक आमदारांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. शिंदे समर्थक आमदारांवर जिल्ह्यातील एका मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून एकनाथ शिंदे यांच्याबाबत जनतेच्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेतले जाणार आहे. एकनाथ शिंदे हेदेखील वेळोवेळी हिंदू गर्व गर्जना यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत हिंदू गर्व गर्जना यात्रेची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी जो फलक तयार करण्यात आला आहे त्यावर शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे गर्व से कहो हम हिंदू है हे वाक्य छापण्यात आले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्र दौरा काढणार असल्याचे जाहीर केले होते. काल पैठणला संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात सभेला संबोधित केल्यानंतर आता एकनाथ शिंदे राज्यव्यापी दौरा करण्याची शक्यता आहे. हिंदू गर्व गर्जना यात्रेद्वारे एकनाथ शिंदे ठाकरेंच्या अगोदर शिवसैनिक आणि मतदारांना साद घालण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या