27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसैनिकांची उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक

शिवसैनिकांची उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यात गेल्या दीड महिन्यापासून शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटात वाक् युद्ध सुरू असताना मंगळवारी पुण्यातील या दोन्ही गटातील वाद शिगेला पोहचला. बंडखोर नेते उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी कात्रज येथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील कात्रज भागात उदय सामंत हे मुंबईच्या दिशेने जात असताना शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवली. त्यांची गाडी अडवत गाड्यांवर फटके मारत चपला आणि बाटल्या देखील फेकण्यात आल्याचे समोर आले आहे.

गद्दार-गद्दार असं म्हणत शिवसैनिकांकडून उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. दरम्यान कात्रज भागात आज आदित्य ठाकरे यांची सभा होती. याच भागातून उदय सामंत हे मुंबईच्या दिशेने जात असताना ट्राफिक खोळबंली होती, यादरम्यान शिवसैनिकांनी उदय सामंत यांची गाडी अडवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीमार केला.

जाहीर सभांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवासेनेचे प्रमुख आदीच्या ठाकरे यांनी एकमेकांवर नाव न घेता परस्परांवर टीका केलीच. तानाजी सावंत यांनी थेट कोण आदित्य ठाकरे? असा प्रश्‍न केल्याने या दोन्ही गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर होते. तर आदित्य ठाकरे यांची कात्रज येथे सभा झाली. या कार्यक्रमांमध्ये दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मात्र या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या