22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसैनिकांच्या अश्रूंची किंमत मोजावी लागेल : उद्धव ठाकरे

शिवसैनिकांच्या अश्रूंची किंमत मोजावी लागेल : उद्धव ठाकरे

एकमत ऑनलाईन

मुंबई : बंडाळीमुळे घायाळ झालेल्या शिवसेनेला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आजही त्यांनी शिवसेना भवनात येऊन पदाधिका-यांची बैठक घेतली. माझ्या एका बाजूला गद्दारांच्या डोळयातले विकृत हसू आहे, तर दुस-या बाजूला माझ्या शिवसैनिक भगिनींच्या डोळयातले अश्रू आहेत. यातून मला मार्ग काढायचा आहे आणि तो मी काढणारच असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्­त केला. गद्दारांना शिवसैनिकांच्या डोळयातील अश्रूंची किंमत मोजावीच लागेल, असा इशारा देताना ज्­यांच्यावर विश्वास ठेवला त्­यांनीच दगा दिल्­याची खंतही त्­यांनी व्यक्­त केली.

मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्­यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे शिवसैनिक, पदाधिकारी यांच्या बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. आज शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिका-यांची त्­यांनी बैठक घेतली. आज मला शक्­ती मिळाल्­याचा अनुभव येत असल्­याचे सांगून उद्धव ठाकरे म्­हणाले, आज बहुतेकींच्या डोळयात अश्रू आहेत. गद्दारांच्या डोळयात विकृत हसू आहे. यात मी मध्ये उभा आहे. मला यातून मार्ग काढायचा आहे आणि तो मी नक्­की काढणार.एकच खंत आहे की जे पंचवीस तीस वर्षे सोबत राहिले ते कट्टर शत्रू झाले. ज्­यांच्यासोबत इतकी वर्षे लढलो ते काँग्रेस आणि राष्­ट्रवादी काँग्रेस हे पक्ष अजूनही सोबत आहेत. ज्­यांच्यावर मी पक्षाची धुरा सोपविली होती त्­यांनीच पाठीत वार केला.हे मला लाजीरवाणे आहे. ज्­यांच्या भरवश्यावर चाललो होतो, त्­यांनीच दगा दिल्­याचे उद्धव ठाकरे म्­हणाले.

काय हिसकावतील हे सांगता येत नाही
हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी अगदी अधिवेशन सुरू असतानाच शिंदे गटाची वाट धरली. बांगर कुठून कुठे गेले असा प्रश्न पत्रकारपरिषदेत विचारला असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक हातात घेउन ते शिवसेनेतच आले असे उत्तर दिले होते. हाच धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, आज त्यांनी माईक हिसकावला, उद्या काय हिसकावतील हे सांगता येत नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या