22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रखासदार धैर्यशील मानेंच्या घरावर उद्या शिवसैनिकांचा मोर्चा

खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर उद्या शिवसैनिकांचा मोर्चा

एकमत ऑनलाईन

हातकणंगले : शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे हातकणंगले मतदारसंघाचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर उद्या शिवसैनिकांचा मोर्चा निघणार आहे. धैर्यशील माने यांना जाब विचारण्यासाठी हा शिवसैनिकांचा मोर्चा असणार आहे. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे. यावर धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून त्यांच्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. शिवसैनिकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची माझी तयारी असल्याचे खासदार माने यांनी म्हटले आहे.

उद्या शिवसैनिकांचा धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा निघणार आहे. या पार्श्वभूमीवर धैर्यशील माने यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. शिवसेनेचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्यामुळे नेमकं हे का घडलं? कशामुळे घडलं? यासाठी त्यांचा होणारा आक्रोश व संवेदना मी शिवसैनिक म्हणून समजू शकतो.

याचे उत्तर घेण्यासाठी काढण्यात येणा-या मोर्चाला कुठल्याही प्रकारचा विरोध होता कामा नये. मोर्चामध्ये सहभागी होणारा प्रत्येकजण हा आपलेच बंधू-भगिनी आहेत. त्यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे हे त्यांचा सहकारी म्हणून माझे कर्तव्य असल्याचे धैर्यशील माने यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या