24.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home महाराष्ट्र हाथरस प्रकरणावरून शिवसेना आक्रमक, मुंबईत निदर्शने !

हाथरस प्रकरणावरून शिवसेना आक्रमक, मुंबईत निदर्शने !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२ (प्रतिनिधी) हाथरस बलात्‍कार प्रकरणावरून काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणामुळे देश हादरला आहे. केवळ एका निष्‍पाप मुलीवरच नाही तर त्‍यानंतर प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरही गँगरेप करण्याचा प्रयत्‍न झाला आहे.त्‍यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन त्‍यावर भाष्‍य करावे अशी मागणी शिवसेना खा.संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेच्या वतीने चर्चगेट स्‍थानकाबाहेर या घटनेविरोधात आंदोलनही करण्यात आले आहे.शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तर या प्रकरणी मुंबईत गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी उत्‍तरप्रदेशला पाठवावे अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

हाथरसमध्ये त्‍या तरूणीच्या मृतदेहाला रात्रीच्या अंधारात पेट्रोल टाकून जाळण्यात आले.तो काही अंत्‍यसंस्‍कार नव्हता.रामाच्या प्रदेशात या प्रकारामुळे सीतामाईला पुन्हा एकदा धरणी दुभंगून आपल्‍याला पोटात घेईल काय असेच वाटले असेल.या प्रकरणी समाज तसेच अभिव्यक्‍तीस्‍वातंत्रयाचाही गळा घोटला जातोय.पत्रकारांना घटनास्‍थळी जाउन पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यापासून मज्‍जाव केला जातोय.जनतेला उघड काही बोलायची भिती वाटते आहे.

मुंबईत एका नटाची हत्‍या झाली हत्‍या झाली म्‍हणून ओरडणारे आज का बोलत नाहीत? त्‍या पिडित मुलीने तर जबाबात म्‍हटले आहे की बलात्‍कार झालाय.मग ते गप्प का असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्‍त्रीयांच्या समस्‍यांबाबत बोलताना नेहमीच संवेदनशील असतात.बोलताना त्‍यांच्या डोळयांच्या कडा ओलावलेल्‍या मी पाहिल्‍या आहेत.त्‍यामुळे आता स्‍वतः पंतप्रधानांनीच या प्रकरणाची माहिती घेउन देशातील जनतेला माहिती दयावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

शिवसेनेची निदर्शने !
शिवसेनेकडून चर्चगेट रेल्‍वेस्‍थानकाबाहेर उत्‍तरप्रदेश सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.खा.अरविंद सावंत यांच्या नेतृत्‍वाखाली हे आंदोलन करण्यात आले.उत्‍तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

मुंबई पोलिसांना तपासाला पाठवा
हाथरस प्रकरण योगी आदित्‍यनाथ सरकारने अतिशय बेजबाबदारपणे हाताळले आहे.त्‍यामुळे या प्रकरणात मुंबईत गुन्हा नोंदवावा व मुंबई पोलिसांना तपासासाठी उत्‍तरप्रदेशला पाठवावे अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलिस गुन्हा दाखल करुन मुंबईत येऊ शकतात. मग हाथरस प्रकरणात तपास मुंबई पोलिसांनी उत्तरप्रदेशात जाऊन तपास करायला काय हरकत आहे ? असा सवाल प्रताप सरनाईक यांनी केला.

रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा ! – देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या