28.2 C
Latur
Monday, March 8, 2021
Home महाराष्ट्र गणेशमूर्तींचे विसर्जन न करता त्याची छुप्या पद्धतीने विक्री-शिवसेनेने आरोप

गणेशमूर्तींचे विसर्जन न करता त्याची छुप्या पद्धतीने विक्री-शिवसेनेने आरोप

एकमत ऑनलाईन

धुळे : यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामूहिक गणेशमूर्ती विसर्जन करु नये, यासाठी मूर्ती संकलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगरपालिकेने गणेशमूर्तींचे संकलित केलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन न करता त्याची छुप्या पद्धतीने विक्री करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरगुती गणपतीची प्रतिष्ठापनासाठी नियम आणि अटी लागू करण्यात आले होते. तसेच विसर्जन मिरवणुकीला ध्वनिक्षेपक आणि जमावबंदीचा आदेश काढण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्यावतीने गणेशमूर्तींचे संकलन करण्यात येऊन त्याचे विसर्जन करण्यात येत होते. मात्र दोंडाईचा नगरपालिकेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दोंडाईचा शहरातही नगरपालिकेच्यावतीने सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्त्यांचे संकलन करण्यात आले होते. मात्र नगरपालिकेने या मूर्त्या विक्री केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. नाशिकहून आलेल्या एका ट्रकमध्ये गणपती भरले गेले, अशी माहिती शिवसैनिकांनी दिली आहे.

‘दोंडाईचा नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. भाजपचे कार्यकर्ते उद्धवा मंदिराचे दार उघड असा नारा देत होते. मात्र दुसरीकडे हेच भाजपचे कार्यकर्ते गणेशमूर्तींची सर्रासपणे विटंबना करताना दिसून येतात’, असा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

समन्स बजावणार : रियालाही होऊ शकते अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या