मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता राजकीय रंग चढला आहे. शिवसेनेकडून काँग्रेसच्या नगरसेवकांवर आरोप वाढले आहेत. मनपातील माजी गटनेते रवी राजा यांनीही सेनेवर निशाणा साधला आहे.
नगरविकास खात्याच्या निर्देशावरूनच प्रशासनाने मुंबईतील वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणात फेरफार केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण सोडतीत शिवसेनेने स्वत:चा फायदा करून घेत काँग्रेसच्या जागांवर जाणूनबुजून मोठे फेरफार केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, आसिफ झकेरिया, सुफियान वनु, कमरजहाँ सिद्दीकी या मुंबईत काँग्रेसकडून चांगली कामगिरी करणा-या नगरसेवकांचे वॉर्ड आता अडचणीत सापडले आहेत.
शिवसेनेकडून जाणीवपूर्वक मुंबईत काँग्रेसची ताकद वाढू नये याकरिता प्रयत्न होत आहेत. त्यावर तोडगा काढू, असे महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.