27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेकडे केवळ १४ आमदार?

शिवसेनेकडे केवळ १४ आमदार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात राजकीय भूकंप आलेला आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे २९ आमदारांसोबत सूरतमधील हॉटेलमध्ये असल्याचा दावा भाजपने केला आहे. एकनाथ शिंदेंनी अनेक आमदारांसोबत मिळून बंड केला आहे. अशात या संपूर्ण प्रकरणावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीसाठी शिवसेनेचे ५५ पैकी फक्त १४ आमदार उपस्थित राहिले आहेत. काही आमदार अद्याप प्रवासात असून ते याठिकाणी पोहोचत असल्याचं सांगितलं जात आहे.

हे आमदार वर्षावर पोहोचले
१.वैभव नाईक २. रविंद्र वायकर ३. गुलाबराव पाटील ४. दादा भुसे ५. संजय राठोड ६. मंगेश कुडाळकर ७. सुनिल प्रभू ८. आदित्य ठाकरे ९. प्रकाश फातर्पेकर १०. अजय चौधरी ११. राहूल पाटील १२. दिलीप लांडे १३.उदय सामंत १४. राजन साळव. एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सुरतमधील हॉटेलमध्ये थांबले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. अखेरीस एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे सुरतमध्ये पोहोचले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी हॉटेलवर जाऊन शिंदे यांची भेट घेतली. पण एकनाथ शिंदे यांची अट आहे की ते थेट मुख्यमंर्त्यांशी बोलणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या