22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेना ‘एनडीए’ला मतदान करण्याच्या तयारीत

शिवसेना ‘एनडीए’ला मतदान करण्याच्या तयारीत

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांच्या बंडानंतर तसेच काही निवडक खासदारांच्या आग्रहानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पक्षातील काही सहका-यांच्या हट्टानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे ‘एनडीए’ला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाला १० ते १२ खासदारांचा पाठिंबा असल्याचे वृत्त वरचेवर येत आहे. तसा दावाही एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज सेना खासदारांची बैठक बोलावली.

येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. ‘यूपीए’कडून यशवंत सिन्हा तर ‘एनडीए’तर्फे द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याच निवडणुकीत भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी सेनेमधील काही खासदारांची मागणी आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तसे पत्र लिहिले आहे. उद्धव ठाकरे बहुधा एक पाऊल मागे येऊ शकतात किंबहुना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊ शकतात.

‘एनडीए’मध्ये असूनही दोनवेळा शिवसेनेने यूपीएच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. २००७ साली प्रतिभाताई पाटील आणि नंतर प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला.

अजून तरी शिवसेना राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहे तसेच २ वर्षांपूर्वीच शिवसेना ‘एनडीए’मधूनही बाहेर पडली आहे. युती-आघाडी न बघता उमेदवार पाहून पाठिंबा देण्याचा शिवसेनेचा मागील इतिहास पाहता द्रौपदी मुर्मू यांची पार्श्वभूमी व सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेता शिवसेना पाठिंबा देऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या