गुवाहाटी : विधानपरिषदेच्या निकालानंतर व्हाया सुरत, गुवाहाटी येथे मुक्कामी गेलेल्या एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी रेडिसन ब्लू या हॉटलचे संपूर्ण बिल दिल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आठ दिवस मुक्काम होते. बुधवारी चेक आऊट करताच या सर्वांनी हॉटेलची बिले दिल्याचे एका कर्मचा-याने सांगितले. ही रक्कम ६८ ते ७० लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात आले.
हॉटेल बुकिंगवेळी येथील सर्वच्या सर्व म्हणजेच ७० खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातील सर्व आमदार सामान्य पाहुण्याप्रमाणे याठिकाणी थांबले होते असेही हॉटेलमधील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
या हॉटेलमध्ये आमदार ज्या रूम्समध्ये थांबले होते त्या सुपीरियर आणि डिलक्स श्रेणीतील होत्या. रेडिसन ब्लूच्या वेबसाइटनुसार, या हॉटेलच्या खोल्यांचे भाड्यात दररोज बदल केला जातो. सामान्यत: सुपीरियर रूमचे भाडे सुमारे ७५०० च्या आसपास तर, डिलक्स रुमचे भाडे दररोज ८५०० रुपये असते.