26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेना आमची म्हणणा-यांना स्वबळावर सर्व निर्माण करावे

शिवसेना आमची म्हणणा-यांना स्वबळावर सर्व निर्माण करावे

एकमत ऑनलाईन

नाशिक : सत्तानाट्यानंतर मविआ सरकार कोसळले. आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे नवे राज्य आले. दरम्यान, पक्षबांधणीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत नाशिक दौ-यावर आहेत. दरम्यान, राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या शिवसेनेच्या नव्या पक्ष चिन्हाबाबत राऊतांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली.

हिंदूत्वावादी म्हणून घेणा-या ४० जणांनी भूंमिका स्पष्ट करावी. जी पुन्हा उभी राहणार आहे ती खरी शिवसेना. मातोश्री माझी, शिवसेना माझी असे म्हणाणा-यांनी स्वत: सर्व निर्माण करावे. शिवसेना अजुनही भक्कम आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे आहे आणि सेनेचेच राहणार अशी स्पष्ट भूमिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

शिवसेनेने धनुष्यबाणाची आशा सोडली?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटच पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाचा खरा दावेदार आहे. असे शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास गाफिल राहू नका, पक्षाच्या नव्या चिन्हाची तयारी ठेवा. जे नवे निवडणूक चिन्ह येईल ते स्वीकारून लवकरात लवकर त्याची पूर्वतयारी करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिका-यांना दिल्याचे समजते. माझी प्रकृती ठीक असल्याने आता आम्ही शिवसेना भवनात दररोज उपलब्ध आहोत, असे सांगत त्यांनी पदाधिका-यांना विरोधकांशी हस्तांदोलन करण्यास तयार असल्याचे संकेत दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या