22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeमहाराष्ट्रगोव्यात शिवसेना २०-२५ जागांवर लढणार

गोव्यात शिवसेना २०-२५ जागांवर लढणार

एकमत ऑनलाईन

पणजी : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिल्यानंतर आता शिवसेनेने गोवा विधानसभा निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे. गोव्यात शिवसेना २० ते २५ जागांवर लढणार असल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे गोव्यात भाजपची कोंडी होणार असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. गोव्यात शिवसेना लढणार आहे. आम्ही गोव्यातील २० ते २५ जागांवर लढणार आहे, असे राऊत यांनी आज स्पष्ट केले. स्वबळावर लढल्याने पक्षाचा विस्तार होईल, असेही त्यांनी सांगितले.

गोवा विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. पुढील वर्षी गोवा विधानसभेच्यान निवडणुका होणार आहेत. गोव्यात एकूण दहा मुख्य राजकीय पक्ष आहेत. तिथे शिवसेनाही गेल्या अनेक वर्षांपासून गोवा विधानसभा निवडणुका लढवत आहे. महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्यासाठी आणि भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना नेहमीच गोवा विधानसभा निवडणुकीच्या ंिरगणात उतरत असते. सध्या गोव्यात भाजपचे सरकार आहे. गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असला तरी भाजपने मित्रपक्षांसोबत आघाडी बनविण्यात बाजी मारल्याने काँग्रेसला सत्तेपासून वंचित राहावे लागले आहे़

बिहार, बंगालनंतर गोव्यावर नजर
शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीतही उमेदवार उतरवले होते. बिहारमध्ये शिवसेनेच्या उमदेवारांचे डिपॉझिटही जप्त झाले होते़ त्यानंतर शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ममता बॅनर्जी यांना पांिठबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपला फायदा होऊ नये आणि राज्यात पुन्हा ममता बॅनर्जी यांचं सरकार यावे म्हणून शिवसेनेने हा निर्णय घेतला होता. त्यावर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी जोरदार टीकाही केली होती.

टीम इंडियाचा दणदणीत विजय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या