27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही; संजय राऊत

शिवसेना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही; संजय राऊत

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन राज्यात हालचालींना वेग आला आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात येईल, अशी घोषणा शिवसेनेने केली आहे. मात्र, संभाजीराजे अपक्ष लढवण्यावरच अजूनही ठाम आहे. अशात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.
संजय राऊत यांनी सांगितले आहे की, संभाजीराजे हे
स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते छत्रपती आहेत. त्यामुळे राज्यसभेसाठी त्यांना विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, संभाजीराजेंकडे त्यासाठी आवश्यक मते नाहीत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेकडे आपल्याला पांिठबा देण्याची मागणी केली होती. मात्र, शिवसेनेचे स्वत:चे उमेदवार असताना आम्ही अपक्ष उमेदवाराला पांिठबा कसा देऊ शकतो? त्यामुळेच आम्ही त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. मात्र, अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी ते आग्रही असल्याचे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले, आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे. त्यामुळे आम्ही अपक्ष उमेदवार मग तो कोणीही असो त्याला पाठिंबा देणार नाही. स्वत: उद्धव ठाकरे यांचाच हा निर्णय असून राज्यसभेवर शिवसेनेचेच दोन उमेदवार जातील, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार असतानाही आम्ही दोन पाऊले मागे जाण्यासाठी तयार आहोत. संभाजीराजेंनी एक पाऊल तरी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी संजय राऊत यांनी केली. तसेच, याबाबतचा अंतिम निर्णय हा संभाजीराजेंचाच असेल. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्धार पाहता त्यांनी मतांची बेगमी केली असेल, असेही राऊत म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या