26.9 C
Latur
Sunday, January 24, 2021
Home मराठवाडा औरंगाबादेत शिवसेनेची पडझड, निष्ठावंत वळले हिंदुत्ववादी मनसेकडे

औरंगाबादेत शिवसेनेची पडझड, निष्ठावंत वळले हिंदुत्ववादी मनसेकडे

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबादमधील शिवसेनेच्या काही निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. राज यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मनसेकडे येण्याचा कल वाढला असून त्यामुळे औरंगाबादेतील शिवसेनेची पडझड आणखी वाढेल असे बोलले जाते. जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या माध्यमातून झालेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शांती पाठाचं पठण केलं. मनसेचा बदललेला झेंडा आणि राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाची भूमिका आगामी काळात आणखी प्रखर होण्याची शक्यता दिसत आहे.

शिवसेनेला निष्ठावंतानीच दिली सोडचिठ्ठी…
शिवसेनेच्या निष्ठावंतांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन मनसेत प्रवेश केला आहे. यात काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा शिवसेना आणि चंद्रकांत खैरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. औरंगाबाद शिवसेनेत उपशहर प्रमुख, जिल्हा संघटक अशी पदे भूषवलेल्या सात बड्या शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला आहे.

सत्तेची समिकरणे बदलण्याची शक्यता
औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे बिगुल कधीही वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने कबंर कसली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ही समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गेल्या फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला होता.

सशस्त्र सीमा दलात नोकरीची चांगली संधी; उमेदवारांची तयारी सुरू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,416FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या