25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeमहाराष्ट्रशिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवतीर्थाऐवजी सावरकर स्‍मारकात !

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवतीर्थाऐवजी सावरकर स्‍मारकात !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२२ (प्रतिनिधी) कोरोनाच्या संकटामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवतीर्थाऐवजी जवळच असणा-या स्वा.सावरकर स्‍मारकात होणार आहे. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह केवळ मोजक्या नेत्यांची उपस्थितीत हा मेळावा होईल व त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्‍यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा कायम शिवतिर्थावरच होतो. एक-दोन अपवाद वगळता आजवर या परंपरेत खंड पडलेला नाही. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे समारंभ व सोहळ्यांवर निर्बंध आहेत. त्यामुळे यंदा दसरा मेळावा होणार की नाही याबाबत साशंकता होती. ऑनलाइन मेळावा घेण्याची चर्चाही होती. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा असल्याने छोटेखानी का होईना कार्यक्रम घ्यावा व परंपरा सुरू ठेवावी असा आग्रह पक्षात होता. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थाऐवजी शेजारच्याच सावरकर स्‍मारकात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

मोजक्‍याच निमंत्रितांना प्रवेश !
सावरकर स्मारकात होणाऱ्या या दसरा मेळाव्यासाठी काही मोजक्या नेत्यांची उपस्थिती असेल. मुख्यमंत्री उदधव ठाकरे मेळाव्याला संबोधित करतील. कार्यक्रमाचे स्वरूप निश्चित करण्यात येत असल्‍याची माहिती शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी दिली. गेल्‍या सात महिन्यांपासून राज्य कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनामुळे आलेले आर्थिक संकट, वादळ, अतिवृष्‍टीसारख्या नैसर्गिक आपत्ती, केंद्राचा असहकार, सुशांतसिंह राजपूत आत्‍महत्‍या प्रकरण व त्या माध्यमातून शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपाची रणनीती अशा अनेक पातळ्यांवर लढताना उद्धव ठाकरे यांची दमछाक होते आहे. मुख्यमंत्री म्हणून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी नियमित संवाद साधत असतात. पण दसरा मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमच राजकीय व्यासपीठावरून बोलणार असल्याने ते काय बोलणार याबद्दल निश्चितच उत्सुकता आहे.

मनोरंजन क्षेत्रबाबतचे धोरण लवकरच निश्चित करण्यात येणार – अमित देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या