24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेचे ढोंगी हिंदुत्व उघडे पडले मनसेचा खोचक टोला

शिवसेनेचे ढोंगी हिंदुत्व उघडे पडले मनसेचा खोचक टोला

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठीची अत्यंत अटीतटीची निवडणूक रंगली असतानाच महाविकास आघाडी अणि भाजपनेही ‘विजय आमचाच’ असा दावा केला. एमआयएम, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडीची मते मिळवण्यासाठी देखील महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू होते.

पाठिंबा मागायचाच असेल, तर तो उघडपणे मागा. आमच्या मतदारसंघातील विकासकामे होत असतील, तर आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली. त्यानंतर आज इम्तियाज जलील यांनी एमआयएमचे दोन्ही आमदार महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजपाचा पराभव करण्यासाठी आमचा पक्ष एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमच्या महाराष्ट्रातील दोन्ही आमदारांना कॉँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगितले असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली आहे. आता यावरून मनसेने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ‘त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचे नकली, ढोंगी हिंदुत्व उघडे पडले आहे, असे काळे यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या